रायगड आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान आंबेनळी घाट रस्त्यावर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर दरोडा गोटे आणि माती मुख्य मार्गावर आल्यामुळे ती हटवण्याकरता पुढील चार दिवसांचा कालावधी लागणार असल्याने आज दिनांक 10 जुलै ते 14 जुलै 2025 पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी आदेश करण्यात आला असून वाहतुकीकरिता पर्याय मार्ग म्हणून पोलादपूर माणगाव ताम्हणी मार्गे पुणे सातारा तसेच पोलादपूर चिपळूण पाटण सातारा मार्गे कोल्हापूर असे पर्याय मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत पुढील चार दिवस पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान चा आंबेनळी घाट रस्ता सुरक्षा ती त्याच्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारच्या वाहतुकी करता बंद करण्यात आला असल्याचा आदेश आज रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी दिला आहे / वाहतुकीसाठी मुख्य मानल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटामध्ये डोंगराचा भाग रस्त्यावर, चार दिवस प्रशासनाकडून आंबेनळी घाट पूर्णता बंद
मागील काही वर्षांपासून पावसाळ्यामध्ये आंबेनळी घाटात दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या असून वर्दळीचा असलेला व वाहतुकीसाठी मुख्य मानला जाणाऱ्या आंबेनळी घाटामध्ये गुरुवारी मोठ्या प्रमाणात दगड गोटे व डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर आल्याची घटना घडली असून घटना घडल्यानंतर तातडीने पोलादपूर प्रशासनाने व रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने यामध्ये कोणती दुर्घटना घडली नाही. मात्र सदरची दरड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व खबरदारी म्हणून प्रशासनाने 14 जुलै पर्यंत आंबेनळी घाट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद केल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी जाहीर केली आहे.घाटामध्ये दरड व माती बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे वाहन चालक यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे