गेली नऊ दिवस विराजमान झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या श्री अंबा भवानी मातेच्या नवरात्रोत्सवाची सांगता झाली. अंबा भवानी मातेच्या मूर्तीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. यावेळी मूर्तीची विसर्जन मिरवणूक सगळ्यात लक्षवेधी ठरली. माजी आमदार संजय कदम, शहर प्रमुख दर्शन महाजन तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. फटाक्यांची आतषबाजी, आणि डीजेच्या तालावर शेकडो तरुणांनी थिरकत मिरवणुकीत रंगत आणली.
हातात पेटती मशाल घेऊन काल रविवारी सायंकाळी अंबा भवानी देवीची अत्यंत उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने गर्दीचा उच्चांक मोडला अत्यंत उत्साहात आनंदात अंबा भवानी मातेचे विसर्जन करण्यात आले.