अलिबाग शहरातील शेतकरी भवन येथे मंगळवारी दुपारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान शेकापने शक्तिप्रदर्शन करत आपल्या उमेदवारांची नवे जाहीर करून रणशिंग फुंकले. शेकापतर्फे अलिबागमधून चित्रलेखा पाटील, पेणमधून अतुल म्हात्रे, उरणमधून प्रितम म्हात्रे तर पनवेलमधून बाळाराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सांगोल्यातून गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी देत असल्याचे जाहीर करण्यात आले. ग्रामीण भागात पक्षाची ताकद आणि जनाधार आजही कायम आहे. त्यामुळे निवडणुकीत पक्षाचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, “आमची दोन-तीन उमेदवारांची मागणी आहे. पण आम्ही मविआत बंड करणार नाही. महाराष्ट्रातील वातावरण आज युतीच्या विरोधात आहे. त्याला गालबोट लावणारं कृत्य आमच्याकडून होणार नाही. शरद पवारांनी सांगितलं की, मी स्वतः शेकापसोबत आहे. त्यामुळे शेकापला जागा मिळणार. हे रडगाणं 4 तारखेपर्यंत चालू रहाणार”, अशीदेखील प्रकिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.