नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात आफ्रिकेतील मलावी आंब्याची आवक सुरु झाली आहे. चवीला कोकणातील हापूस आंब्या प्रमाणे असणाऱ्या मलावी आंब्याला भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. यंदा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून मलावी आंब्याचा हंगाम सुरु झाला असून डिसेंबर एन्ड पर्यंत हा आंबा उपलब्ध राहणार आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या मलावी आंब्याला मोठी मागणी आहे. या आफ्रिकन आंब्याची चव कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच असल्यानं या आंब्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सध्या या आंब्याला एक किलोला हजार ते दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे. तर मलावी आंब्याच्या तीन किलोच्या एका बॉक्सची किंमत सध्या तीन ते पाच हजार रुपयापर्यंत आहे. दर्जानिहाय मालावी हापूसला प्रती बॉक्स तीन हजार ते पाच हजार रुपये दराने किरकोळ बाजारात विक्री होण्याचा अंदाज असून आंबे प्रेमिंसाठी ही पर्वणीच ठरणार आहे..गेल्या काही वर्षांपासून मलावी हापूस नियमितपणे एपीएमसी मार्केटमध्ये येत आहे. यंदा हा सिझन आजपासून सुरू झाला. पहिल्या लॉटमध्ये आलेला आंबा आज हातोहात विकला गेला आहे. आता दुसरा लॉट येत्या शनिवारी येणार आहे. त्यानंतर मलावी हापूसची नियमित आवक मार्केटमध्ये सुरू होणार आहे.