खेड, रत्नागिरी – मुंबई गोवा महामार्गावरील भरणे गोवळकरवाडी येथे भरणेनाक्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खासगी आराम बसने प्लेझर दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वार मुबीन नाडकर जागीच ठार झालेला आहे. तर रवींद्र सुरेश सुतार वय-३३, सांची रवींद्र सुतार वय-७ व राहुल संतोष सुतार हे जखमी झालेले आहेत. जखमींना नजीकच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खेड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला असून जखमींवर उपचार चालू असून मृत मुबीन नाडकर याच्या मृतदेहाच्या तपासणीकरिता कळंबणी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👉 Video