म्हाप्रळ : दापोली तालुक्यातील हर्णे येथून तळोजा येथे मासळी घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप व्हॅनचा आंबेत कोकरे गावाजवळ अपघात झाला.अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातात पिकअप व्हॅनचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.
दापोली तालुक्यतील हर्णे बंदर येथून मुंबईतील तळोजा येथे मासळी घेऊन जाणाऱ्या MH 08 AP 1498 क्रमांकाच्या बोलेरो पिकअप व्हॅनच्या चालकाचा व्हॅनवरील ताबा सुटल्याने आंबेत येथील कोकरे गावाजवळ अपघात झाला. समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे व्हॅनचा चालक श्री अनवर शेखनाग याने माझे कोकणशी बोलताना सांगितले. सुदैवाने या अपघातात वाहन चालक श्री अनवर शेखनाग यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मात्र बोलोरो पिकअप व्हॅनचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.