वारीसाठी निघालेल्या भाविकांवर काळानं घात केला. शिरवळ जवळ महामार्गावर वारकऱ्यांच्या ट्रॉलीला भीषण अपघात झाला असून या अपघातात 30 वारकरी जखमी झाले आहेत. तर एका भाविकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

जखमींमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे इथले वारकरी असल्याची माहिती मिळाली. पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. त्यामुळे मदत मिळण्यासही थोडा विलंब झाला. या वारकऱ्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

हे सर्व वारकरी आळंदीला निघाले होते. वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांवरवर काळाने घात केला.जखमींवर शिरवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला आहे.

 

Google search engine
Previous articleमहाविकासघाडीची प्रतिष्ठा पणाला; अंतर्गत नाराजीचा भाजपला थेट फायदा
Next articleमहामार्गावरील परशुराम घाटात बर्निंग ट्रकचा थरार; सुदैवाने मनुष्यहानी नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here