खोपोली, रायगड – मुबंई पुणे जुन्या महामार्गांवर सायममाळ जवळ अवघड वळणावर टाटा हॅरिअर कार आणि एर्टिगा कार यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला असून त्यातील एर्टिगा गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे, त्यातील अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत, जुन्या मुबंई पुणे महामार्गांवर बोरघाटाततुन टाटा हरिअर कार क्रमांक (MH 06 CD -9960) ही खोपोली वरून लोणावळा कडे जातं असताना लोणावळा वरून खोपोली कडे येणारी एर्टिगा कार क्रमांक (MH 03 EL 9113) ही सायमाळ जवळ आली असता टाटा पॉवर जवळील वळणावर आली असता दोन्ही वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एर्टिगा कार मधील चालक आणि सहप्रवाशी गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालय पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत, तर दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी चालू करण्यात आला आहे.