उरण : आजकालच्या युगात आई-वडिलांच्या मालमत्तेतुन हिस्सा मागणाऱ्या मुली आपण नेहमीच पाहात आलो आहोत. पण मरणाच्या दारात असणाऱ्या जन्मदात्या पित्याचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या मुली खूप कमी पाहायला मिळतात.अशीच एक चिरनेर गावातील मुलगी अक्षता खारपाटील हिने आपल्या जन्मदात्या पित्याला मरणाच्या दारातून बाहेर काढण्यासाठी चक्क आपले लिव्हर देऊन जीवनदान देण्याचे काम करुन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. चिरनेर येथील प्रशांत खारपाटील ( वय ४५) यांना कोरोनात लिव्हर सिराँसीनचा आजार जडला.वैद्यकीय निदानानंतर त्यांना लिव्हर ट्रा न्सप्लांटची आवश्यकता असल्याची माहिती नवीमुंबई येथील एका रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांना सहा महिन्यांपूर्वी दिली.त्यामुळे कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर कुटुंबियांचा आधारस्तंभ असणाऱ्या प्रशांत याचे प्राण कोण वाचविणार अशा प्रश्न प्रशांत यांच्या कुटुंबियां समोर आ वासून उभा राहिला. मरणाच्या दारात असलेल्या आपल्या जन्मदात्यासाठी प्रशांत खारपाटील यांची विवाहित जेष्ठ कन्या अक्षता हिने लिव्हर देण्याची इच्छा कुटुंबिय तसेच डॉक्टरां जवळ व्यक्त केली.यावेळी अक्षताचे मनोबल वाढवण्यासाठी व आपल्या सासऱ्याचे प्राण वाचविण्यासाठी अक्षताचे पती पंकज पाटील यांनीही पित्याला तूझे लिव्हर देण्यासाठी प्रोत्साहन दिले.पतीकडून मिळालेल्या पाठबळामुळे अक्षताचा आत्मविश्वास आणखीनच दुणावला.त्यानंतर अक्षताच्या संमतीनेच मुंबई ( परेल ) येथील ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टर रवि मोहंका व त्यांच्या पुर्ण टीमच्या बारा तासांच्या अथक प्रयत्नाने प्रशांत यांच्यावर नूकतीच लिव्हर ट्रा न्सप्लांटची यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली.आज प्रशांत व त्यांची मूलगी अक्षता हे दोन्ही बाप लेक सुखरूप आपल्या घरी परतले आहेत.
समाजात एकीकडे मालमत्तेतुन हिस्सा मिळावा यासाठी आई-वडिलांना कोर्टकचेरीची पायरी चढविण्यास प्रवृत्त करताना मुलं मुली आढळून येतात.तर दुसरीकडे अक्षता सारख्या विवाहित मुलीने जन्मदात्याच्या प्रेमापोटी लिव्हर देऊन समाजात नवा आदर्श घालून दिला आहे. अक्षताने लिव्हर दिले नसते आणि प्रशांत खारपाटील यांची लिव्हर ट्रा न्सप्लांट शस्त्रक्रिया झाली नसती तर ते जगू शकले नसते अशी प्रतिक्रिया ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टर रवि मोहंका यांनी व्यक्त केली.