रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात चोरी आणि दरोड्यांचे सत्र सुरू असताना माणगांव तालुक्यात चॉकलेट कॅडबरी आणि ते थेठ सोने चांदी चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यामध्ये माणगांव शहरातील दिघी पुणे हायवेवर असलेल्या “अमित कॉम्प्लेस “वसाहतीत चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढत सुमारे ५लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत अमित कॉम्प्लेक्स मधील सुमारे ३ फ्लॅट व एक बंगलो या चोरटयांनी फोडला आहे. त्यामध्ये अमित कॉम्प्लेक्स च्या बी विंग मधील रहिवाशी ज्योती शंकर यांच्या घरातील ३ लाख किंमतीचे सोने चांदीचे दागिने ८० हजार रोख रक्कम चोरीला गेले असून अमित कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या चोरीत चोरटयांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.या चोरीच्या घटनेचे अनेक सीसीटीव्ही फुटेज व व्हिडीओ समोर आले आहेत.या चोरीचा अधिक तपास पोलीस करत आहेत . नागरिकांनी सजग आणि जागरूक राहण्याचे वाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे मात्र वारंवार होणाऱ्या चोऱ्यांवर आणि चोरट्यांवर आळा बसत नसेल तर माणगाव तालुक्यातील सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली होणे आवश्यक आहे आणि तशी मागणी देखील महाराष्ट्र शासनाकडे केली जाणार असल्याची माहिती माणगांव मधील नागरिकांनी दिली आहे.

Google search engine
Previous articleमुंबई-गोवा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, अपघातात 17 जण गंभीर जखमी, वाहनांचे नुकसान
Next articleफेंगल चक्री वादळाच्या भीतीमुळे नौका किनाऱ्यावर, प्रशासनाकडून मच्छिमारांना सावधानतेचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here