चिपळूण’ शहरातील उक्ताड भागात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. चिपळूण मधील उक्ताड निवसेकर हाईट या इमारतीत राहणाऱ्या १६ वर्षीय सिद्री अशफाक घारे असे त्या तरुणीचे नाव आहे. चिपळूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्री हि २२ नोव्हेंबर रोजी अडीच वाजताच्या सुमारास उक्ताड कानसेवाडी येथील निवसेकर हाईट इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडली होती. यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. मात्र, उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला आहे. चिपळूण पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

Google search engine
Previous articleखेडमध्ये रेल्वे’ रुळावर आढळला अज्ञात मृतदेह
Next articleमहाबळेश्वर थंडीने गारठला, हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद, गावोगावी ,शहरात पेटल्या शेकोट्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here