रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या सडवे येथील कोडजाई नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या दोघा आत्ये भावांचा दापोली तालुक्यातील सडवे येथील कोडजाई नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.. आयूष अनिल चिनकटे आणि सुजित सुभाष घाणेकर अशी दोघांची नावं आहेत. हे दोघे आत्ये भाऊ मित्रांसमवेत सोमवारी कोडजाई नदीमध्ये मासे पकडण्याकरिता गेले होते. मासे पकडून झाल्यानंतर ते पोहण्यासाठी नदीमध्ये उतरले. मात्र, दोघेही पाण्यात बुडू लागताच काठावर असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला. मुलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. त्यांनी या मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आलं नाही. त्या दोघांवर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुजित घाणेकर काल आपल्या कुटुंबासह मुंबईला जाणार होता मात्र आत्याचा मुलगा आयुष आल्याने मुंबईला न जाता तो थेट नदीवर गेला आणि काळाने त्याच्यावर घाला घातला.आयुष हा मुलगा अतिशय हुशार होता त्याला शिक्षण घेऊन खूप मोठे व्हायचे होते, परंतु त्याचे स्वप्न अधुरे राहिले. दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Google search engine
Previous articleदिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर सिंधुदुर्गातील मालवण मधून हापूस आंब्याची पहिली पेटी नाशिकला रवाना
Next articleपेणमध्ये गांजाची विक्री करणारा अटकेत, १ लाख ७५ हजार ८४० चा मुद्देमाल जप्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here