दापोली – दापोली तालुक्यातील खेर्डी पानवाडी येथील शिंदे गटाचे वाडी प्रमुख श्री.विनेश विश्राम बर्जे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा खेर्डी युवामंच अध्यक्ष श्री.शैलेश हरीचंद्र कदम यांच्या प्रयत्नातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश झाला आहे. दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सोमवारी दापोली तालुक्यातील खेर्डी पानवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या भूल थापाना कंटाळून रत्नागिरी जिल्हाप्रमुख व दापोली मतदार संघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.

श्री.विनेश विश्राम बर्जे यांची खेर्डी उप शाखा प्रमुख पदी नियुक्ती माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली आहे. यावेळी विभागातील सर्व शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख, महीला तसेच शिवसैनिक युवासैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google search engine
Previous articleखेडमध्ये परतीच्या पावसाने उडाली त्रेधातिरपीट, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस
Next articleखेड – तिसंगी गितेवाडी येथेएसटी महामंडळाच्या बसला अपघात, एसटी बसमधील २० प्रवासी थोडक्यात बचावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here