लांजा – रेल्वेतून पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कोकण रेल्वे मार्गावरील आंजणारी बोगद्यानजीक घडली. या अज्ञात तरुणाची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंजणारी बोगद्यानजीक या तरुणाचा मृतदेह आढळून आला. रेल्वेतून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची खबर आंजणारी पोलिस पाटील श्रद्धा सरपोतदार यांनी लांजा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. रेल्वेतून पडल्याने त्याच्या डोक्याला, तोंडाला, हातापायाला गंभीर दुखापती झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी लांजा पोलिस ठाण्याशी (०२३५१-२३००३३) संपर्क साधण्याचे आवाहन लांजा पोलिसांनी केले आहे. लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

Google search engine
Previous articleचिपळूणमध्ये तीन लाखांची घरफोडी
Next articleमासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here