पाली : शिवसेनेच्या इतिहासातील ही पहिली इतकी मोठी गद्दारी झाली आहे. ही गद्दारी भाजप पुरस्कृत गद्दारी आहे. भाजप वाल्यांनो तुमच्या सात पिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही अशी परखड टीका अनंत गीते यांनी केली. पालीतील माजी केंद्रीय मंत्री भक्तनिवास क्रमांक एक मध्ये शिवसेना कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी गीते बोलत होते.

शिवसेना संपविण्यासाठी शिंदे गटातील बंडखोर आता प्रयत्न करत आहेत. ज्यांचा जन्म झाला नव्हता ते आज शिवसेनेवर आपला दावा करत आहेत, अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर गीते यांनी केली. जे शिवसेना सोडून गेलेत त्यांची पर्वा करू नका, आज गद्दारांना खोक्यातून काही मिळेल या आशेने शिंदे गटात काही जण जात असतील, शिवसेना आमच्या हृदयात आहे. विजय नेहमी सत्याचा होतो, आपला विजय निश्चित आहे असा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला. गद्दारांना माफी नाही.

आता कोकणातील पाच गद्दारांना कायमचे मातीत गाडणार आहे. आज मुंबई महानगरपालिका व विधानसभा निवडणुका झाल्या तर बंडखोरासोबत भाजप ही धुळीस मिळेल असे गीते म्हणाले. शिवसेना बुलडोजर आहे, जे जे पायाखाली येतील ते यावर्षी च्या दसरा मेळाव्याला इतकी गर्दी होईल की चार चार शिवाजी पार्क कमी पडतील. अनंत गीते म्हणाले माझं वय 72 आहे, मात्र आमदारांनी गद्दारी केली म्हणून माझं वय आता 27 झाल आहे. आज केवळ शिवसेनेवर संकट नाही तर संपूर्ण भारत देशावर संकट आहे. आज लोकशाही संकटात आहे, आपल्याला लोकशाही वाचवायची आहे. न्यायदेवता आपल्याला न्याय देईल हा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला. सुधागड तालुका प्रमुख मिलिंद देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे या मेळाव्यात दिनेश चिले यांची प्रभारी तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे म्हणाले की बंडखोर आमदारांनी दिलेली कारणे म्हणजे केवळ दिशाभूल करणारी आहेत. केवळ पैशांसाठी हे शिंदे गटात सामील झाले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. भाड्याने घरात राहणारे भाडोत्री मालक होऊ शकत नाहीत.

उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राऊत म्हणाले इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. आज गद्दारांना पुन्हा गाडण्याची वेळ आलीय. असे राऊत म्हणाले. शिवसैनिकांनो आत्ता पेटून उठा, शिवसैनिकांच्या भक्कम पायावर आज ज्यांना मोठमोठी पदे दिली ते लोक आज योगदान विसरले. आज त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे असे राऊत म्हणाले.

Google search engine
Previous article‘लम्पी’ रोखण्यासाठी कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती
Next articleजिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील,सीईओ इंदुराणी जाखड यांची बदली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here