मुंबई : मुंबईच्या कांदिवली परिसरतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कांदिवलीच्या दळवी हाॅस्पिटल परिसरात चार मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून तीन महिलांची हत्या करून आरोपीने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे परिसरात काही काल घबराहट निर्माण झाली आहे.

किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी, शिवदयाल सेन अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. यातील शिवदयाल सेन याच्या खिशात सुसाइड नोट सापडल्या असून त्यात भूमी यांच्या प्रेमात पडल्याने तीन महिलांची हत्या करून गळफास घेतला असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. कांदिवली पोलिस याप्रकरणी अधिकचा तपास करत आहेत.

मिळालेली माहिती अशी की, प्रेम प्रकरणातून तीन महिलांची हत्याकरून आरोपीने गळफास घेतला असल्याची घटना कांदिवली येथे घडली आहे. कांदिवलीच्या दळवी हाॅस्पिटलच्या परिसरात चार मृतदेह आढळून आले आहेत. हे मृतदेह किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी, शिवदयाल सेन यांचे असून प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिकचा तपास कांदिवली पोलिस करत आहेत. या घटनेमुळे कांदिवली परिसरात खळबळ पसरली आहे.

Google search engine
Previous articleचिपळूण : परशुराम घाटातील माती घसरू लागली
Next articleविद्यार्थी अपघात विमा योजनेत केली दुपटीने वाढ;अपघाती मृत्यू झाल्यास कुटुबास दीड लाखांचा निधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here