नागपूर : नागपुरात मध्यरात्री थरारक घटना घटली. आरोपीने दारुच्या नशेत आपल्या सासू-सासऱ्यावर कुऱ्हाडीनं वार केले. यात सासू व सासरे दोघेही ठार झाले. त्यानंतर पत्नी व मुलीवरही कुऱ्हाडीनं वार केले.त्यानंतर पत्नी व मुलीवरही कुऱ्हाडीनं वार केले. यात पत्नी व मुलगी जखमी झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्यरात्री ही थरारक घटना घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अमरनगर येथील वृद्ध दाम्पत्य यात ठार झाले. भगवान रेवारे व पुष्पा रेवारे अशी ठार झालेल्या वृद्ध पती-पत्नीची नावं आहेत. नरमू यादव असं खून करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून कुटुंबात वाद सुरू होता. या वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जातं. एमआयडीसी पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

मध्यरात्री नेमकं काय घडलं

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरनगर परिसरातील ही घटना आहे. नरमू यादव हा दारुच्या नशेत घरी आला. त्यानंतर त्यानं वृद्ध सासु-सासऱ्यांसोबत वाद घातला. हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर नरमूनं कुऱ्हाड काढून सासू-सासऱ्यावर सपासप वार केले. यात भगवान रेवारे व पुष्पा रेवारे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यात पत्नी कल्पना यांनी पतीला अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नरमूनं पत्नीवरही कुऱ्हाडीने घाव घातले. मुलगी मुस्कानलाही मारहाण केली. यात पत्नी व मुलगी दोन्ही जखमी झाल्या. जखमींना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

वादाचं कारण काय

नरमु यादवचा सासू-सासऱ्यांसोबत घरगुती वाद होता. गेल्या तीन-चार दिवसांपासून कुटुंबाद वाद सुरू होता. मध्यरात्री हा वाद पुन्हा उफाळून आला. नरमू बाहेरून दारू घेऊन आला. त्यानं जुना वाद उखरून काढला. त्यानंतर हा प्रकार घडला. दारुच्या नशेत आपण काय केलं, याच भानही नरमूला राहीलं नाही. त्यानं सासु-सासऱ्याची हत्या केल्यानंतर पत्नी आणि स्वतःच्या मुलीवरही कुऱ्हाडीचे घाव घातले. एमआयसीडी पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. तपास सुरू केला आहे. मृतकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हा वाद नेमका काय होता, याचा उलघडा आता नरमूकडून एमआयडीसी पोलीस लवकरच करतील.

Google search engine
Previous articleखेड तालुक्यात पावसाचे पुनरागम; शेतीच्या मशागतीच्या कामांनी घेतला वेग
Next articleपोलीस कारवाईत व्हेल माशाची उलटी जप्त;उलटीची मार्केटमध्ये किंमत ५ कोटी ८० लाख रुपये;एका महिलेसह सहाजण पोलिसांच्या ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here