काही दुकानदार प्रवाशांकडून ठरलेल्या किमतीतून ठरलेल्या किंमतीपेक्षा जास्तीचे पैसे घेत असल्याचे अनेकवेळा रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळते. पण ट्रेन पकडण्याच्या घाईत विक्रेत्यांच्या या मुद्द्याकडे प्रवाशांकडून दुर्लक्ष केलं जातं. पण आता भारतीय रेल्वेने या गोष्टींबाबत कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. रेल्वे स्टेशनवर विक्रेत्यांची मनमानी रोखण्यासाठी (IRCTC) कडून कडक सूचना देण्यात आल्या.

आयआरसीटीसीने (IRCTC)सुचना देताना स्पष्ट शब्दात सांगितले, की कोणत्याही विक्रेत्याने प्रवाशांसोबत कोणत्याही प्रकारची मनमानी करू नये आणि जर कोणी विक्रेता असे करताना आढळले तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जावी.देशातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर विक्रेते प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने पैसे वसूल करत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेकडे येत होत्या. प्रवाशांनी विरोध केल्यानंतरही विक्रेते मनमानी दर आकारत होते. अशा परिस्थितीत रेल्वेने सर्व विभागीय रेल्वे आणि रेल्वे स्टेशनवरील मनमानी विक्रेत्यांवर तात्काळ करण्यात यावी , अशा सूचना दिल्या आहेत. या सुचनेनुसार रेल्वे प्लॅटफॉर्मवर पॅकेटमध्ये विकले जाणारे प्रोडक्ट त्यांच्या एमआरपीवर विकले जाणार.

विक्रेत्यांवर दंडाची तरतूद

खाद्यपदार्थांचे दरही निश्चित केले जाणार आहेत. पण , मेट्रो सिटी आणि छोट्या शहरातील स्टेशनवर दरात तफावत असली तरी हा दर निश्चित ठेवण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक विक्रेत्याने त्यांच्या मालाची दर यादी त्यांच्या स्टॉलसमोर लावणे बंधनकारक असेल.

आयआरसीटीसीने याआधीच विक्रेत्यांबाबत समान दर निश्चित करण्याचे नियम केले आहेत, परंतु या नवीन प्रणालीमध्ये जर कोणत्याही विक्रेत्याने नियमांकडे दुर्लक्ष केले तर त्याचा परवानाही रद्द केला जाईल . याशिवाय विक्रेत्यांकडून दंड आकारण्याचीही तरतूद आहे.

आयआरसीटीसीशी (IRCTC) संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून अशा तक्रारी येत होत्या. भविष्यात प्रवाशांना अशा गैरसोयीला सामोरे जावे लागू नये यासाठी सर्व विक्रेत्यांना मालाची दर यादी लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.याशिवाय आमचे अधिकारी वेळोवेळी स्टेशनवर तपासणीही करतील. प्रवाशांना अशी समस्या असल्यास ते सोशल मीडिया, ट्वीटर आणि हेल्प नंबरच्या माध्यमातूनही त्यांची तक्रार नोंदवू शकतात.

Google search engine
Previous articleरत्नागिरी : जिल्ह्यात पाणीटंचाई कायम; १७ टँकरने पाणीपुरवठा
Next articleतब्बल 800 जागांसाठी भरती; स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्यांसाठी मोठी संधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here