विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडीच्या अस्तित्वाची आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशा स्वरूपात आता थेट लढत होत असतानाच महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरघोडींचा फायदा जर भाजपाने घेतला, तर महाराष्ट्रामध्ये पुढील काही महिन्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे सहा उमेदवार असून भाजपाचे पाच आहेत एकूण जागा दहा असून उमेदवार अकरा आहेत.

अशा परिस्थितीत जर भाजपाचे पाच विधान परिषदेचे उमेदवार जिंकले आणि विधान परिषदेत एकूण 145 मतदान पेक्षा अधिक मत कमवली तर मात्र महाविकासआघाडी अल्पमतात आहे, असा संकेत जाणार आहे. यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढेल.

जर महा विकास आघाडीने मतांचा कोटा भलेही मागेपुढे झाला तरी, सर्व उमेदवार जिंकून आले आणि भाजपाचा पाचवा उमेदवार पडला तर मात्र महाविकास आघाडी कितीही संकटात असली तरी एकोपा असल्याचा संकेत जाणार आहे. यामुळे विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडीसाठी फार महत्त्वाची असणार आहे.

Google search engine
Previous articleराज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा
Next articleवारीसाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; एकाचा मृत्यू ; 30 जण जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here