मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात अचानक पेट घेतलेल्या बारा चाकी ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . हा बर्निंग थरार पाहायला मुंबई-गोवा महामार्गावर ची दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.ही आग कशामुळे लागली हे कारण अद्यापही स्पष्टझालेले नाही, मात्र अचानक पेट घेतलेल्या या ट्रक मधील सर्व सामान व कॅबिनेट जळून खाक झाले आहे.

चिपळूणहून खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीकडे एमएच ०८, एच २२९१ या क्रमांकाचा ट्रक जात हाेता. परशुराम घाटातील विसावा पॉईंट येथे पोहाेचताच ट्रकच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. त्याचवेळी चालक व क्लिनरने सावध होत ट्रकमधून बाहेर उडी घेतली. त्यानंतर काही क्षणातच ट्रकच्या समाेरील भागाला लागली. या आगीत ट्रकची केबिन पूर्णतः जळून खाक झाली. या घटनेनंतर महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांची लांबचलांब रांग लागली होती.

या घटनेची माहिती मिळताच चिपळूण नगर परिषदेचे अग्निशमन दल तेथे दाखल झाले. या दलाने काही वेळातच ही आग नियंत्रणात आणली. ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली असून, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन नुकसानाचा पंचनामा सुरु केला आहे. शनिवारी दुपारी एक ते दीड वाजता ची घटना आहे.

Google search engine
Previous articleसोने-चांदीच्या दरात घसरण, पहा 10 ग्रॅमचा आजचा भाव
Next articleलाल रक्तपेशींतील दोषामुळे ‘सिकलसेल’ चा आजार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here