खेड : गतवर्षी २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीतदरम्यान कमकुवत झालेल्या तालुक्यातील डुबी नदीवरील पिंपळवाडी धरणाची डागडुजी आता अंतिम टप्प्यात असून पावसाळ्यापूर्वीच धरण सुरक्षित झाल्याने धरण परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गतवर्षी या परिसरातील सुमारे १०० कुटुंबाना धरणफुटीच्या भीतीने स्थलांतरीत व्हावे लागले होते.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात ढगफुटी होऊन खेड, चिपळूण या दोन्ही तालुक्यांना   मोठा फटका बसला. खेड तालुक्यातील पोसरे येथे डोंगर खचुन तब्बल १७ जणांचा बळी गेला तर बिरमणी येथे दोघेजण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. अतिवृष्टीतचा फटका तालुक्यातील धरण प्रकल्पानाही बसला होता.. मोठ्या धरणांपैकी एक धरण असलेल्या  डुबी नदीवरील पिंपळवाडी धरणाचा मुख्य बंधारा आणि मार्गदर्शक भिंत वाहून गेली त्यामुळे  हे धरण  सुमारे ३० ते ३५ % कमकुवत झाले होते ,

धरणाचा मुख्य बंधाराच वाहून गेल्याने धरण परिसरातील ७ गावांना धोका निर्माण झाला होता . खबरदारी म्हणून परिसरातील सुमारे १०० कुटुंबाना स्थलांतरित करण्यात आले होते. कमकुवत झालेल्या पिंपळवाडी धरणाची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने जलसंपदा विभागामार्फत धरणाच्या डागडुजीसाठी २ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून युद्धपातळीवर काम करून  धरणाची वाहून गेलेली मार्गदर्शक भिंत आणि बंधारा दुरुस्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता हे धरण  सुरक्षित झाले असून धरण फुटण्याचा धोका देखील टळला आहे.

धरणाच्या डागडुजीसाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर धरणाचे उपअभियंता सत्यजित गोसावी यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पिंपळवाडी धरणाच्या डागडुजूचे काम सुरु केले.जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर , कार्यकारी अभियंता जगदीश पाटील आणि उपअभियंता सत्यजित गोसावी यांच्या प्रयत्नाला आणि ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आले आणि कमकुवत झालेले पिंपळवाडी धरण अखेर सुरक्षित झाले आहे. धरण सुरक्षित झाल्याचे खात्री पटली असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Google search engine
Previous articleकोकणातील नद्यांवर R.T.D.A .S. सिस्टीम कार्यान्वित ; एका क्लिक वर कळणार पाऊस आणि नद्यांची पातळी .
Next articleएका सेल्फीमुळे सिंहगडावर घडला धक्कादायक प्रकार, मधमाशांनी केला भीषण हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here