पेण शहरातून एक १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार सदर बेपत्ता झालेली मुलगी ही १० फेब्रुवारीपासून बेपत्ता झाली असून तिचा रंग गोरा, अंगाने मध्यम, चेहरा गोल, केस काळे, नाक सरळ, उंची पाच फूट पाच इंच, अंगात नेसूस काळ्या रंगाचा बुरखा, पायात चप्पल, सोबत मोबाईल असे वर्णन असून फिर्यादी यांच्या सांगण्यावरून त्यांच्या मुलीला कुणीतरी अज्ञात कारणावरून फूस लाऊन पळवून नेले असल्याबाबत पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ घोलप करीत आहेत. तरी सदर मुलीबाबत कुणाला माहिती मिळाल्यास पेण पोलिस ठाण्याजवळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.