चिपळूण – चिपळूण येथील महावितरणच्या कार्यालयासमोर निवृत्त कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. दिवसभर घोषणा देण्यात आल्या. त्यांच्या मागण्यांबाबत दि. 26 सप्टेंबर रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आता होता, परंतु कर्मचाऱ्यांनी तक्रार अर्ज व आंदोलनाचे पत्र देऊन देखील प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर या विरोधात आणि सेवानिवृत्ती नंतरचे हक्काचे आर्थिक लाभ व्याजासह मिळेपर्यंत सेवानिवृत्तीधारक कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. वीज क्षेत्रासाठी गेली चाळीस वर्षे आपण काम केले. मात्र, चिपळूणच्या प्रशासनाने आर्थिक फसवणूक केली आहे. या विरुद्ध हा लढा उभारण्यात आला आहे. या आंदोलनात वीज आस्थापनेतील सर्व कर्मचारी संघटना सहभागी झाल्या असून दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत हे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती सेवानिवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक व सेवानिवृत्त वीज कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी दिलीप आंब्रे यांनी दिली. या आंदोलनात अनेक निवृत्त कर्मचान्यांनी सहभाग घेतला आहे. चिपळूण विभागातील महावितरणमध्ये काम करणाऱ्या सेवा निवृत्त कर्मचान्यांना सेवानिवृत्ती नंतरचे अंतिम उपदान, रजा रोखीकरण देण्यामध्ये फसवणूक केल्याप्रकरणी व या निवृत्त कर्मचाऱ्यांना वंचित ठेवल्याबद्दल हे आंदोलन छेडण्यात आले आहे .