मुंबई : Dilip Walse Patil Corona Positive : राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) कमी झाल्याने अनेक नियमांत शिथिलता आणली गेली. मात्र, कोरोनाचा धोका कायम आहे. काही ठिकाणी कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. आपली प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे, असे ट्वीट दिलीप वळसे-पाटील यांनी केले आहे.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आवाहन केले आहे की, नागपूर आणि अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी. त्यांनी लक्षणे आढळून आल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

Google search engine
Previous articleसुसेरी खून प्रकरणातील संशयीतांना १० दिवसांची पोलीस कोठडी
Next article…नाही तर आर्यन खानची यंदाची दिवाळी तुरुंगातच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here