संगमेश्वर, रत्नागिरी – संगमेश्वर कोळंब येथे डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून तो कुरधुंडा येथील मुजीब सोलकर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे . हा अपघात दुपारी एकच्या सुमारास झाला असून अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला अपघाताची माहिती मिळताच कुरधुंडा गावासह परिसरातील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. अपघातातील डंपर जे एम म्हात्रे कंपनीचा असून, कंपनीच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली आहे मात्र, डंपरचालक पळून गेल्याने व कंपनीचे अधिकारी वेळीच घटनास्थळी न पोहोचल्याने जमाव संतप्त झाला आहे.