खेड-रत्नागिरी – आज दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास खेड मधील ऐनवरे या गावी दुचाकीचा अपघात होऊन सागर खेडेकर नामक युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सागर खेडेकर हा युवक खोपी गावातील रहिवासी असून छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल, खोपी येथे शिपाई या पदावर कार्यरत आहे. झालेल्या अपघाता संदर्भात अद्याप अधिकची माहिती मिळालेली नाही. परंतु त्याच्या या दुर्दैवी अपघाताने समुर्ण पंचक्रोशी हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतदेह पुढील तपासणी साठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला व पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.